सर्परूप सोमनाथ दर्शन कथा
श्री क्षेत्र कंरजे येथील
सर्परूप
सोमनाथ दर्शन
श्री गणेशाय नमः | श्री कालिका माताय नमः | श्री सरस्वत्यै नमः |
श्री गुरूभ्योनमः | श्री पार्वतीपरमेश्वराय
नमः |
कैलासराणा शिव चंद्रमौळी | फणींद्र माथा मुकटी झळाळी |
कारूण्य सिंधो भवदुःख हारी | तुजवीण शंभो मज कोण
तारी |
ॐ नमः शिवाय | ॐ नमः शिवाय | ॐ नमः शिवाय |
सौराष्ट्रे
सोमनाथ च, श्रीशैले मालिकार्जुनम् । उज्जयिनियां महाकालंम् ओंकरम् ममलेश्वरम्। परल्यां
वैजनाथं च, डाकिन्या भीमशंकरम् । सेतुबंधेतु
रामेशं नागेशंम् दारुकावने। वारणास्यांतू विश्वेशं, त्र्यंबकं गौतमी तटे। हिमालये तु
केदारं, घृष्णेशं शिवालये । एतानि ज्योतिलिंगांनी,
सायंप्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापाम्, स्मरणेय विनश्यती ।।
शास्त्राभ्यास नको, श्रुती पढु नको तीर्थासि जाऊ नको।
योगाभ्यास नको, व्रते मख नको तीव्र
तपे ती नको।
काळाचे भय मानसी नको दृष्टासि शंकू
नको ।
ज्याचिया स्मरणे पतित तरती तो शंभू
सोडू नको ।।
पार्वती पते हर हर महादेव । प्रभू
भोलानाथ कि जय ।
कथा पोती
वंदू
प्रथम गजानना । गौरीहराच्या नंदना । गणाधीश सिंदुरवंदना । भक्त संकटी तारितो ||१||
सरस्वतीला
करून नमन । वीणा झंकार ऐकून । झालो मी पतित पावन । शारदेच्या वरदाने ।।2||
श्री
गुरुचे करिता स्मरण । संकटकाळी ये धावुन । केवळ करिताही चिंतन । चिंता सर्व निवारितो
।।३।।
बारा
ज्योतिलिँगे शिवस्थान । सोरटीसोमनाथ प्रथम । त्याचे विशेष महिमान । कथा पावन थोर ती
।।४।।
सांब
सदाशिव पार्वतीरामन । नाना अवतार धरून ।। दुष्ट
संहार , सुजन पालन । अखंड कार्य करितसे ।।५।।
त्यातील
एक विशेष अवतार । कलियुगांतही चमत्कार । सोमनाथ सर्परूपे साकार । दर्शन देतो दरवर्षी
।।६।।
त्याची
कथा हि पुण्यपावन । आरंभितो ग्रंथलेखन । श्रोते देऊनी कान-मन । सावधचित्ते ऐकावी ।।७।।
पैठणास
नाथांचा रांजण भरे । राजापूरला गंगा अवतरे । शनिशिंगणापूरची उघडी दारे चमत्कार सारे
पाहती ।।८।।
महाराष्ट्रात
पुणे जिल्ह्यात । बारामती विभागात । करंजे नाम क्षेत्र विख्यात । लाखो लोक जाणती ।।९।।
तेथील
हा इतिहास । त्याची कथा खास विशेष अद्यापही साक्ष दिसण्यास । परमेशाची लीला ती ।।१०।।
महादू
नामक एक गवळी । करंजे गावी गाई वळी । त्याची
पत्नी साधीभोळी । मालन नाम तियेचे ।।११।।
सासू
नणंद जाव दीर । मालू कष्ट करी अपार । पती सेवाही निरंतर ।मन लावूनी करीतसे ।।१२।।
लग्न
झाले, वर्ष गेली । मालू माता नाही झाली । वांझोटी हो घरी आली । सासू सदा हिणवीत ।।१३।।
दैवास
आपल्या दोष देत । सर्वांचे बोलणे सोशित । देवाची प्रार्थना करीत । मालू दिवस कंठितसे
।।१४।।
"
काय करू परमेश्वरा । पूर्वजन्मीचा हा फेरा "। अपराधांची क्षमा करा । पोटी पुत्र द्यावा कि ।।१५।।
पोटी
पुत्र व्हावा म्हणुनी । तुळशीला घातले पाणी । पिंपळ प्रदक्षिणा उपवास करुनी । ग्रोग्रासही
घातले ।।१६।। सारे नेमधर्म केले । साऱ्यांचे बोल सोशिले । परि फळ नाही मिळाले । जिणे
झाले नकोसे ।।१७।। ऐसी मालू दुःखीकष्टी । उदास बैसे लावुनी दृष्टी । परंतु देवदयेची
दृष्टी । झाली नाही तिजवरी ।।१८।। एके दिवशी प्रसंग घडला । मालू एकटीच घराला । साधू
एक दारीं आला । भिक्षेसाठी आरोळी ।।१९।।
मालू
दिसली उदास । साधू बोले सावकाश । चिंता कसली माई खास।
सांग
संकट कोणते ।।२०।। मुले माणसे कोठे गेली । सामसूम का घरात
झाली
। उदासीनता तुज का आली । सोमयाचा विचारतो ।।२१।।
बरे
विचारिले
महाराज। सांगते मी मनीचे गूज । उपवास व्रते,
केली रोज ।
परी
देव नाही पावला ।।२२।। वांझपणा नशिबी आला । जीव नकोसा झाला ।
कोणता
उपाय सांगा मला । देव कोणता कैवारि ।।२३।। साधूने
सांगितला
उपाय । सोमनाथाचे घरी पाय । मंत्र ॐ नम: शिवाय । पुजा रोज करावी ।।२४।।
रात्री
एकान्तात जावे । वाळूचे शिवलिंग करावे । सोमनाथास मनोभावे ।
पूजुनी
प्रार्थना करावी ।।२५।। नित्यनेम हा पाळावा । बोल कधी न चुकावावा ।
दासाचा
या भरवसा धरावा । पावेल तुज सोमया ।।२६।। काही दिवसांनी
सोमनाथ
। देईल तुला दृष्टांत । त्या संदेशाचे पालन कीत । मनोरथ तुझे
पुरतील की ।।२७।। इतके सांगून साधू गेला । मालूने
मग निश्चय केला । नव्या
तेजाचा
किरण मिळाला । सोमनाथाच्या कृपेचा ।।२८।। घरात सामसूम
पाहून
। रोज मध्यरात्री उठून । गंध, फुले, बेल घेऊन । मालू नदीकाठी जातसे ।।२९।।
वाळूचे
शिवलिंग बनवून । पूजा मनोभावे करून । परत
आपल्या
घरी येऊन । मालू शांत झोपतसे ।।३०।। महिने गेले; वर्षे गेली ।
नित्यनेम
पूजा झाली । पटिसेवाही अखंड केली । प्रतिव्रता मालूने ।।३१।।
एके
रात्री चमत्कार झाला । वाळुकीपिंडीतून आवाज आला । " थेट ये मालू सौराष्ट्राला
।
तेथे
पूजा कर माझी "।।३२।। तो देवाचा संदेश ऐकून । मालू गेली हरखून ।
परी
सौराष्ष्ट्राला जावे कोठून । पेंच तिला पडला तो ।।३३।।
सौराष्ट्र
देशी सोमनाथ । साधूने सांगितली ख्यात । ते तिच्या आले ध्यानात
परी
तेथे केवी जाऊ ।।३४।। हात जोडुनी विनविले । देवा तुम्ही सांगता
भले
। परंतु संकट मजला आले । पायापाशी येण्याचे ।।३५।। पिंडीतून
पुनः
आवाज आला । दररोज याच ठिकणाला ।। विमान येईल तुला
न्यायला
। त्यात बसुनी येत जा ।।३६।। क्षणात दर्शन झाल्यावरी । विमान
येईल
माघारी । जावे त्वां नंतर घरी । चिंता काही करू नको ।।३७।। संदेश
ऐकून
चकित झाली । मालू सावकाश घरी गेली । विचारात रात्र संपली ।
पुढे
काय होईल ते ।।३८।। मध्यरात्री दुसऱ्या दिवशी । मालू गेली नदीपाशी ।
वाळू
घेऊन हाताशी । शिवलिंग करू लागली ।।३९।। आकाशातून
तेवढ्यात
एक
दिव्य विमान येत । उतरले मालूच्या पुढ्यात । मालू त्यात बैसली ।।४०।।
ॐ
नमः शिवाय म्हणता । विमान उडाले गगनपंथा । थेठ सोरटीसोमनाथा ।
महाद्वारी
उतरले ।।४१।। विशाल ते महाद्वार । सोमनाथाचे भव्य मंदिर ।
दृष्टी
देखोन क्षणभर । मालू भान विसरली ।।४२।। डोळे भरून मूर्ती पहिली ।
मनोभावे
पूजा केली । परतुनी महाद्वारी आली शांत बैसली
विमानात ।।४३।।
विमान
उडाले क्षणात । परतुनी आले करंजे नदीत । मालू उतरूनि घरी येत
शेजेवर
झोपली ।।४४।। ऐसा नेम रोज चालला । मालू जाई सोमनाथाला ।
दर्शन घेऊन परत घराला । रोज रात्री येतसे ।।४५।।
बायको रात्रीच उठते ।
कोठेतरी
बाहेर जाते । परतुनी हळूच येते । मांजराच्या पाउली ।।४६।।
महादूच्या
ध्यानी आले । संशयाने झपाटले । मनाशी त्याने ठरविले । शोधिले
हे
पाहिजेच ।।४७।। एकदा त्याने काय केले । सोंग झोपेचे घेतले । किल केल्या
डोळ्यांनी
पहिले । मालू कधी उठते ती ।।४८।। मालू हळूच उठली ।
परडी
पूजेची घेतली । नदीकाठाकडे गेली । नित्य नेमाप्रमाणे ।।४९।।
पाठोपाठ
महादू उठला । चोर पावली चालला । तोही नदीकाठी गेला ।
मागोमाग
मालूच्या ।।५०।। तेवढ्यात ते विमान आले ।
आकाशातून उतरले ।
वाळूमध्ये
थांबले । मालू बैसली विमानात ।।५१।। महादू लगबग धावला ।
विमानाच्या
जवळ गेला । उडताच खालच्या बाजूला । घट्ट त्याने पकडले ।।५२।।
विमान
उंच उडाले । सौराष्ट देशाला गेले । मंदिरापाशी ते उतरले ।
सोमनाथ
प्रभूच्या ।।५३।। परंतु प्रकार काय झाला । दरवाजा नाही उघडला ।।
"देवा
काय अपराध घडला । आज दर्शन का नाही?" ।।५४।। मालूची ती हाक ऐकून । आवाज आला मंदिरातून
। "तुझा पती आला मागुन ।
म्हणून
दार तुला बंद तुला" ।।५५।। मालू झाली बावरी । इकडे तिकडे शोध करी|
लपलेला
पती तरी । तिला कैसा दिसणार ।।५६।। मालूने मग निश्चय केला ।
कळवळून
म्हणाली देवाला, । "दर्शन जर का नसेन
मला । प्राण पायरीशी अर्पीन" ।।५७।। तात्काळ दरवाजा उघडला । दर्शन झाले मालूला । हात जोडून मग प्रभूला
। मालू काय म्हणाली, ।। ५८।।
"हे
असे मी सोडुनी गावा । रोज इथे देवा । घातक असे माझ्या जीवा । सासुरवाशीण मी असे ।।।५९।।
त्या
परीस एक करा ना । दर्शन माझ्यासह सर्वांना । घडवण्यासाठी तुम्हीच या ना । करंजे गावी
कायमचे ।।६०।।
पिंडीतून
आवाज आला । "ठीक ! तथास्तु " देव म्हणाला । मालु जा आता गावाला । तेथे येईन
मी कायमचा ।।६१।।
कसा
येईन, केव्हा येईन । योग्य वेळी दृष्टान्त
देईन । सोरटी सोमनाथ मी होईन । करंजे गावी प्रकट ।।६२।।
तुझ्यामुळे
माझे येणे । तेथे भक्तांना दर्शन देणे । ही कथा ऐकून पावन होणे । अघटित एक आश्चर्य
।६३।।
मालूने
मग उघडले डोळे । आजचे दर्शन आगळे । देव येतील माझ्यामुळे । माझ्या करंजे गावाला ।।६४।।
मग
मालू बैसली विमानात । क्षणात उडाले गगनात । महादू राहिला पाहत । विमान निघुनी गेलेले
।।६५।।
"मालूच्या
या वागण्याला । संशयाने डाग लाविला । आता पच्याताप झाला । बायको माझी पवित्र ।।६६।।
कैसा
मी जाईन गावात । ऐसा तो बडबडत । पिसाट राहिला फिरत । विचार काही सुचेना ।।६७।।
मालू
विमानात गेली । करंजे गावी उतरली । घरी जाऊन पाहू लागली । पती नाही शेजेत ।।६८।।
देवा
हे काय झाले । देंवाचे बोल आठवले । बरोबर माझे पती गेले । सोरटी सोमनाथला ।।६९।।
ते
आत्ता तिकडेच राहिले । एकटीच मी येथे आले । पुढे काय नशिबी ठेले । लोक काय म्हणतील
।।७०।। माझा अपमान करतील । नको दोष देतील । व्हायचे ते होईल । आता भार देवावरी ।।७१।।
नम:
मंत्र जपत । मालू दिवसरात्र कंठीत । लोकांचे बोल सोशीत । अपमान सारे गिळोनि ।।७२।।
काही
दिवसांनी मालूला । प्रभूने दृष्टान्त दिला । उद्या प्रगटेन करंजे गावाला । गायरानात
येई तू ।।७३।।
सर्परूपाने
येईन । गाईचे दूध पिईन । सर्वाना दर्शन देईन । लोकांना तू सांग हे ।।७४।।
मालू
दचकून जागी झाली । विचार मनी करू लागली । सोमनाथाची इच्छा मली सर्परूपाने प्रकटतील
।।७५।।
दुसऱ्या
दिवशी घरचा गोंधळ । मालूला पडली भुरळ । गायरानात जाण्यास वेळ । मिळाला नाही मालूला
।।७६।।
तिकडे
सकाळी गाई सुटल्या । गाईरानी चरू लागल्या । दुपारी पाण्यावरी गेल्या । खिल्लार सारे
पांगले ।।७७।।
एक
मोठा भुजंग आला । कपिलेचे सड पिऊ लागला । तो प्रकार पहिला । खोमण्या नावाच्या गुराख्याने
।।७८।।
ओरडला
तो भीती वाटली । नेम धरून कुऱ्हाड फेकली । भुजंग मस्तकी खोक पडली । रक्त वाहिले भळाभळा
।।७९।।
भुजंग
गेला सळसळत । घुसला जवळच्या वारुळात । खोमण्या सर्वांना हाक देत । जमले सारे गुराखी
।।८०।।
मोठा
सर्प कोठून आला । गाईचे दूध पिऊ लागला । खोमन्याने कुऱ्हाड मारली त्याला । रक्त सर्वांनी
पहिले ।।८१।।
ही
वार्ता पसरली गावात । खोमण्याला शाबासकी देत । ऐकोनी मालू झाली चकित । दृष्टान्त तिला
आठवला ।।८२।।
मालूने
खोमण्यास बोलाविले । म्हणाली, सर्प रुपी सोमनाथ आले। त्यांना तू दुखावले । बरे नाही
केलेस हे ।।८३।।
खोमणे
म्हणाला, "चुकलो माई" । मला ते कळलेच नाही । झाले गेले विसरून जाई । क्षमा
करावी दासाला ।।८४।।
हुरहुरली
ती गौळण । घडले नाही देव दर्शन । आता केव्हा होईन पावन । सर्परूप देव दिसतील का ।।८५।।
दुसऱ्या
दिवशी खोमणे । रानात गेला लगबगीने । रक्त सांडले पहिले त्याने । तिथे लोळण घेतली ।।८६।।
माती
लावली कपाळास । देवा तुम्हांस दिला त्रास । चुकलेल्या या दासाला । क्षमा करावी दयाळा
।।८७।।
खोमण्याची
दया येऊन । साक्षात प्रगटले भगवान । म्हणाले अरे तूच धन्य । प्रथम दर्शन घडले तुला
।।८८।।
जखमेची
खून जपेन । उत्सवात प्रथम दर्शन । तुझा मी ठेवीन मान । वंशोवंशी वचन हे ।।८९।।
नंतर
देव गुप्त झाले । मालूला हे सर्व कळले म्हणाली, हे बरे केले । लोकांनाही आनंद ।।९०।।
मालू
गौळण खिन्न झाली । दर्शनाची खंत घेतली । रात्रंदिवस आस लागली । सर्परूप सोमनाथाची ।।९१।।
मग
एके रात्री काय झाले । दर्शन देऊन देव म्हणाले "ज्या स्थळी माझे रक्त सांडले ।
तेथे जमीन खोदावी ।।९२।।
खोच
पडलेली माथ्याच्या । शिवलिंग सापडेल तेथे । तोच मी सोरटी सोमनाथ । करंजे गावी आलेलो
।।९३।।
तिकडे
महादूची हकीकत । पिसाट राहिला फिरत । मालू, मालू हाकरिता । रानोवनी शोधीतसे ।।९४।।
डोंगर
नद्या पार करित । ओलांडला प्रांत गुजराथ । नंतर आला महाराष्ट्रात । वाट काढीत कष्टाने
।।९५।।
तहान
भुकेने तळमळला । काटे भरले अंगाला । तसाच सोशीत फिरला । कष्टदशा अपार ।।९६।।
सुमारे
साठ दिवस सरले । करंजे गाव त्याला दिसले । कीव त्याची करू लागले । घरचे गावचे सर्वही
।।९७।।
मालू
ही थोर भक्त । तिला प्रसन्न सोमनाथ । प्रत्यक्ष पाहिलेली मात । महादूने कथा सांगितली
।।९८।।
प्राणनाथाची
भेट झाली । मालू आनंदाने फुलली । सोमनाथामूर्ती
आली । करंजे गावी दर्शनाला ।।९९।। रक्त
जेथे सांडले । गावकऱ्यांनी खोदले । खुणेचे शिवलिंग मिळाले । आनंदले सर्व जन ।।१००।।
वर्गणीची
महापूर । बांधले तेथे मंदिर। स्थापना सभारंभ थोर । प्रभू सोमनाथ कृपा ।।१०१।।
महादू
मालू जोडीला । बैसिवले त्या पूजेला । मोठा थाटमाट केला । सांगता झाली व्रताची ।।१०२।।
गाभाऱ्यातून
प्रभू बोलिले,।"करंजे करंजे गावात सर्प निघाले । व्रणभूषण माथी मिरविले । तोच
सर्प मी सोमनाथ ।।१०३।।
खोमनण्यास
ओळख पटेल । हाती खांदी खेळवील । दूध मला पाजील । दर्शन सर्व भक्तांना ।१०४।।
वश
झालो मालूच्या भक्तीला । सर्वांचे कल्याण करायला । सौराष्ट्र सोडूनी करंजे गावाला ।
सर्परूपाने प्रगटलो ।।१०५।।
दरवर्षी
श्रावणात । सरत्या येथे । सर्परूप मी सोमनाथ । दर्शन देईल भक्तांना" ।। १०६।।
लोक
मग पाहू लागले । अनेक सर्प तेथे दिसले । खोमन्याने ओळखले । माथी खून जखमेची ।।१०७।।
त्याने
देव हाती घेतला । अंगी खांदी खेळविला । दूध पाजुनी पूजिला । सर्परूप सोमनाथ ।।१०८।।
दर्शन
झाले मालूला अती हर्ष झाला तिला । देव आता उद्धरी मला । सार्थक झाले जन्माचे ।।१०९।।
मळून
हात जोडले । तोच दिव्य विमान आले । अंतराळात घेऊन गेले । प्राणज्योत सतीची ।।११०।।
मालूचा
देह निश्वल झाला । त्याचा दगडी पुतळा बनला । महादू शोक सागरी बुडाला । गेली म्हणाला
प्राणप्रिया ।।१११।।
घेतले सतीचे वाण । तिने साधिले लोककल्याण । धन्य
झाले तिचे जीवन । करंजे क्षेत्री स्मारक ।।११२।।
यात्रा
श्रावणी सोमवारी । लाखो भक्त करिती वारी । सोमनाथ प्रभू कैवारी । दर्शन घेता पावतो
।।११३।।
पुत्रप्राप्ती,
रोगनिवारण । विद्या, विवाह, प्रगती, धन । भूतपिशाच्च संकट हरण । अनुभव आले कैकांना
।।११४।।
शंभुराये
प्रेरणा दिली । म्हणूनच ही ग्रंथरचना झाली । मनोभावे प्रार्थना केली । कल्याण होईल
सर्वांचे ।।११५।।
सतीच्या
कहाणीचे वाचन । निर्मळ करील अंतःकरण । भक्तभाविक पुण्यपावन । दर्शन घेतील सोमयाचे ।।११६।।
मनात
धरून । करंजेक्षेत्री जाऊन । श्रावणी सोमवार
साधून दर्शन घ्यावे प्रभूचे ।।११७।।
घरी
तरी सोमवारी । कहाणी ही कल्याणकारी । वाचावी हि मनोहारी । मनोरथ पुरवील ।।११८।।
सर्प
येतील स्वप्नात । दृष्टान्त देईल सोमनाथ । त्यास सांगावा मनीचा हेत । त्याची कृपा होईल
कि ।।११९।।
पूर्व
जन्मीचे सुकृत । दर्शने पापनाश होत । सतीची कहाणी आठवीत । ॐ नम: शिवाय म्हणावे ।।१२०।।
सोमवारी
करावा उपवास । बेल वाहवा शंकरास । पुरवील तो मनीची आस । भरवसा खास धरावा ।।१२१।।
महात्म्य
हे मनोभावे । अनेकांना ऐकवावे । पुण्य ते पदरात घ्यावे । भक्ती मार्ग चांगला ।।१२२।।
सांब सदाशिव शंकर भोला नंदीवर बैसकरंजे
तो ।
सवे पार्वती आणि गणपती भक्ताला पावतो
।
भक्त जनाला उध्दरण्याला सोडूनि सौराष्ट्राला
।
सोमनाथ तो मालूसाठी गावी आला ।।१।।
सर्परूपाने श्रावणात दरसाल पहा दिसतो
।
दर्शन घेण्या, पावन होण्या, लोक
लाख जमतो ।
प्रणाम माझा धमभी प्रभूला भक्तीचा
कैवारी ।
निर्मळ कवीची ही प्रार्थना संकट
निवारी
Comments
Post a Comment